आजपासून पुणे, पिंपरी- चिंचवड अनलॉक

सातत्यानं वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता 

Updated: Jul 24, 2020, 07:23 AM IST
आजपासून पुणे, पिंपरी- चिंचवड अनलॉक title=

पुणे : सातत्यानं वाढणाऱ्या CORONAVIRUS  कोरोना रुग्णांची संख्या पाहता काही दिवसांपूर्वी PUNE पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं गेलं. ज्यानंतर आता शुक्रवारी म्हणजेच २४ जुलै २०२० ला लॉकडाऊनचे हे नियम शिथील करण्यात येत आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून लागू केलेल्या या लॉकडाऊनला शिथील करतेवेळी काही महत्त्वाचे नियम पिंपरी - चिंचवड आणि पुणे या भागांमध्ये लागू असणार आहेत. त्यामुलं नागरिकांनी सतर्कता बाळगत प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

Lockdown लॉकडाऊन शिथील करतेवेळी सदर भागामध्ये लागू करण्यात आलेल्या नव्या नियमावलीनुसार प्रतिबंधीत क्षेत्रांमध्ये लॉकडाऊनचे नियम अद्यापही लागू असतील. तर, त्याव्यतिरिक्त इतर भागांमध्ये भाजी मंडई, फळ बाजार, आणि इतर दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

शहरातील दुकानं ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहतील. पी1 आणि पी2 म्हणजेच सम- विषम तत्त्वाअंतर्गत ही दुकानं खुली राहणार आहेत. त्याशिवाय लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी सलून आणि ब्युटी पार्लर ज्या तत्त्वांअंतर्गत कार्यरत होते, त्याचनुसार ते सुरु राहतील. 

 

अनलॉकच्या या टप्प्यामध्ये खासगी कार्यालयांमध्ये १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. तर, व्यायामशाळा आणि जलतरण तलाव मात्र अद्यापही बंद राहणार आहेत. एकंदरच लॉकडाऊन शिथील करतेवेळी काही नियमांमध्ये नागरिकांना सवलत देण्यात आली असली तरीही गाफील न राहता कोरोनाला आळा घालण्यासाठी स्वयंशिस्त पाळत प्रशासनाला सहकार्य करण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे.