महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुणतांब्यातही बंद

आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुणतांब्यात बंद ठेवण्यात आला आहे. या बंदमध्ये शिवसेनाही सहभागी झाली आहे. रात्री नगर तालुक्यातल्या टाकली काजीमध्ये झालेल्या आंदोलनात  शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे आणि पोलिसांची बाचाबाची झाली. त्या नंतर पोलिसांनी गाडे यांना अटक केली आहे.

Updated: Jun 5, 2017, 09:47 AM IST
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुणतांब्यातही बंद title=

अहमदनगर : आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुणतांब्यात बंद ठेवण्यात आला आहे. या बंदमध्ये शिवसेनाही सहभागी झाली आहे. रात्री नगर तालुक्यातल्या टाकली काजीमध्ये झालेल्या आंदोलनात  शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे आणि पोलिसांची बाचाबाची झाली. त्या नंतर पोलिसांनी गाडे यांना अटक केली आहे.

रात्रीच राहुरी-सोनई रोडवर पोलीस बंदोबस्तात चाललेला दुधाचा टँकर पेटवून देण्यात आला. संपाला पाठिंबा म्हणून माजी मंत्री बाळासाहेब थोरात संचलित राजहंस दूध संघाचे दूध संकलन आजपासून बंद करण्यात आले आहे. दरम्यान आज किसान सभेचे अजित नवले पुणतांबा येथे आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत.