राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

Rain Alert : Rain in  Maharashtra - राज्यात रविवारपर्यंत पावसाळी स्थिती कायम राहणार आहे.  

Updated: Dec 4, 2021, 08:27 AM IST
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता title=
संग्रहित छाया

मुंबई : Rain Alert : Rain in  Maharashtra - राज्यात रविवारपर्यंत पावसाळी स्थिती कायम राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारपासून पावसाळी वातावरण दूर होण्याची शक्यता आहे. मात्र, सकाळी आणि रात्री धुकं पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Rain Alert - Chance of rain in Konkan and Central Maharashtra)

अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र, आणि कोकण किनारपट्टीवरील चक्रवातामुळे हा पाऊस पडत आहे. मात्र कमी दाबाचे क्षेत्र रविवारपासून कमी होत जाईल. त्यामुळे रविवारनंतर पावसाळी वातावरण दूर होण्याची शक्यता आहे. 

राज्यात अवकाळी पावसाच्या संकटामुळे सर्वच जण हैराण झालेत. ही स्थिती रविवारपर्यंत अशी राहण्याची शक्यता आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात पावासाची शक्यता आहे. 

समुद्रातील स्थिती निवळत आहे. त्याचप्रमाणे कुठेही नव्याने कमी दाबाचा पट्टा नाही. रविवारनंतर राज्यात सर्वत्र पावसाळी वातावरण दूर होऊन कोरडं हवामान निर्माण होण्याचा अंदाज आहे.

5 डिसेंबरपासून हवामान कोरडे झाल्यानंतर दिवसाचे कमाल तापमान सामान्य स्थितीत येऊन रात्रीच्या किमान तापमानात घट होईल.