पार्थ पवार की समीर भुजबळ? राष्ट्रवादी राज्यसभेवर कोणाला पाठवणार, आज ठरणार?

Rajya Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला राज्यसभेचा उमेदवार आज ठरवणार असल्याची शक्यता आहे. आज पक्ष याबाबत बैठक घेणार आहे.   

Updated: Feb 13, 2024, 11:28 AM IST
पार्थ पवार की समीर भुजबळ? राष्ट्रवादी राज्यसभेवर कोणाला पाठवणार, आज ठरणार? title=
Rajya Sabha Election 2024 parth pawar sameer bhujbal likely to constant

Maharashtra Politics News: महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्यसभेचेही वेध लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षदेखील आपला राज्यसभेचा उमेदवार आज ठरवणार असल्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीत इच्छुकांची मोठी संख्या असल्याचे समोर येतेय. तर, काही जणांची नावेदेखील चर्चेत आहेत. (Maharashtra Politics News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देऊ शकते, अशी शक्यता आहे. देवगिरी निवासस्थानी आयोजित संध्याकाळच्या सातच्या बैठकीत उमेदवाराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सोमवारी वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर आज आमदारांसोबत चर्चा करून उमेदवाराची घोषणा करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

महायुतीकडून सर्वजणांचे एकत्रित उद्या राज्यसभेचा अर्ज दाखल करण्यास हालचाली असल्याचे समोर येत आहे. राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, समीर भुजबळ किंवा पार्थ पवार ही तीन नावे राज्यसभेसाठी विचाराधीन आहेत. या नावापैकी आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आमदारांसोबत चर्चा करुन नाव निश्चित होईल, अशी माहिती सूत्रांकडून कळतेय. अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी आज बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम उमेदवारावर शिक्कामोर्तब होणार आहे. 

शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाची सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. अजित पवार यांना पक्ष आणि चिन्हे देण्याचे निवडणुक आयोगाचे निर्णयाविरोधात शरद पवार गटाने धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा याचिकेच्या नमूद केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात तब्बल 800 पानांची कागदपत्र दाखल केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती दिली आहे.