आज नागपुरात संघाच्या प्रतिनिधीसभेला सुरुवात

कर्नाटक,राजथान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका तोंडावर असताना, आज नागपुरात संघाच्या प्रतिनिधीसभेला सुरुवात झालीय. 

Updated: Mar 9, 2018, 10:18 AM IST
आज नागपुरात संघाच्या प्रतिनिधीसभेला सुरुवात title=

नागपूर : कर्नाटक,राजथान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका तोंडावर असताना, आज नागपुरात संघाच्या प्रतिनिधीसभेला सुरुवात झालीय. 

ईशान्येतील ३ राज्यांमध्ये मिळालेला विजय आणि त्यातील संघाची भूमिका बघता या प्रतिनिधीसभेला विेशेष महत्व आहे. दरम्यान  सभेच्या सुरूवातीला सभेत बोली आणि भाषा याबाबत प्रस्ताव येणार आहे. देशातल्या विविध प्रांतांतील भाषा, बोली तेथील परंपरांच्या संवर्धनासाठी प्रस्तावाअंतर्गत सभेत चर्चा होणार आहे.

सभेच्या पूर्वसंध्येला त्रिपुरातली लेनिनचा पुतळा हटवण्यासंबधी संघाचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आले. संघपरिवारातल्या सुमारे १५०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नागपुरात हजेरी लावली आहे. संघ कार्याची पुढील तीन वर्षातली दिशा  या बैठकीत ठरणार आहे.