'सनातनशी संबंध नाही मग वकील कशासाठी ?'

 देश आणि धर्मासाठी काम करणाऱ्या तरुणांनी सनातनपासून दूर राहावं असंही साडवीलकरनं सांगितलं. 

Updated: Aug 11, 2018, 05:19 PM IST

कोल्हापूर : सनातन संस्था तरुणांची माथी भडकावतेय असा आरोप दाभोलकर-पानसरे हत्याप्रकरणातला प्रमुख साक्षीदार संजय साडवीलकर यानं केलाय. नालासोपारा इथल्या घटनेत सनातनचा संबध नाही असं सनातन संस्थेनं जाहीर केलय. मात्र दुसरीकडं मात्र अटक करण्यात आलेल्या आरोपीसांठी सनातनच्या वकीलांची फौज उभी करण्यात आलीय. यावरुनच अटक करण्यात आलेले आरोपी आणि सनातनचा कशाप्रकारचा संबंध आहे हे स्पष्ट होतंय असं त्यानं म्हटलंय. देश आणि धर्मासाठी काम करणाऱ्या तरुणांनी सनातनपासून दूर राहावं असंही साडवीलकरनं झी मीडियाला सांगितलं.