आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधवचा विक्रम

आंध्रप्रदेशातील विजयवाडा इथे ७८ व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकने पुन्हा दोन पदकांची कमाई केली आहे. 

Updated: Dec 15, 2017, 07:48 PM IST
आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधवचा विक्रम title=

नाशिक : आंध्रप्रदेशातील विजयवाडा इथे ७८ व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकने पुन्हा दोन पदकांची कमाई केली आहे. 

संजीवनी जाधवचा विक्रम

संजीवनी जाधव हिने पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत स्वत:चा विक्रम मोडीत काढून नवीन विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. अवघ्या १५ मिनिटे ५१ सेकंद ५८ शतांश सेकंदाचा विक्रम तिने केलाये. यापूर्वीचा तिचा वैयक्तिक विक्रम हा १५ मिनिटे ५९ सेकंदांचा होता. नाशिकच्याच किसन तडवीने याच शर्यतीत रौप्यपदक मिळविले. किसनने १४ मिनिटे ३९ सेकंद ५६ शतांश सेकंदसह द्वितीय क्रमांक पटकावला. 

चुरशीची लढत

पंजाब विद्यापीठाच्या रणजितकुमारने ही शर्यत १४ मिनिटे ३९ सेकंद १९ शतांश सेकंदासह पूर्ण केल्याने चुरशीच्या लढतीत दुस-या कार्माकावर समाधान मानावे लागले. ताई बामणे सह इतर खेळाडूनी मिळविल्यामुळे नाशिकचा दबदबा देशभरात कायम आहे.