गोंदियात सारस पक्ष्यांच्या संख्येत घट

प्रेमाचं प्रतिक मानल्या जाणा-या सारस पक्ष्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियात सारस पक्ष्यांची गणना नुकतीच पार पडली. या गणनेत सारस पक्ष्यांच्या संख्येत घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. 

Updated: Jun 17, 2017, 03:01 PM IST
गोंदियात सारस पक्ष्यांच्या संख्येत घट title=

गोंदिया : प्रेमाचं प्रतिक मानल्या जाणा-या सारस पक्ष्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियात सारस पक्ष्यांची गणना नुकतीच पार पडली. या गणनेत सारस पक्ष्यांच्या संख्येत घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. 

सारसच्या संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सेवाभावी संस्था काम करत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून 10 ते 15 जून दरम्यान ही गणना करण्यात आली. 

यामध्ये गोंदिया जिल्ह्यात 30 ते 32 सारस आढळून आलेत. लगतच्या भंडारा जिल्ह्यात 2 तर चंद्रपूरमध्ये 1 सारस आढळून आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत 3 ते 4 सारस कमी आढळल्याने चिंता व्यक्त केली जातेय.