गोकुळचा दूध उत्पादकाना दिलासा तर ग्राहकांना झटका, दूध दरात इतक्या रुपयांची वाढ

गोकुळचा दूध उत्पादकाना दिलासा तर ग्राहकांना झटका, दूध दरात इतक्या रुपयांची वाढ

Updated: Jul 9, 2021, 06:48 PM IST
 गोकुळचा दूध उत्पादकाना दिलासा तर ग्राहकांना झटका, दूध दरात इतक्या रुपयांची वाढ title=

मुंबई :  गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. तर दुसऱ्या बाजूला ग्राहकांना झटकाही दिलाय. गोकुळच्या पंचवार्षिक निवडणूकीवेळी सत्ताधारी नेत्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलंय. सत्ताधाऱ्यांनी सत्तेत आल्यानंतर दूध उत्पादकांना 2 रुपये दूध दर वाढ देण्याच आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन पूर्ण केलंय. त्यानुसार आता दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा गोकूळ दूध संघाचे नेते पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.  (satej patil and hasan mushrif are declare to give relief to milk produce farmer and announced hiking on milk sale rate) 
    
त्यानुसार दूध संघ आता उत्पादक शेतकऱ्यांना म्हशीच्या दूध दरात लीटरमागे 2 तर गायीच्या दूधामागे 1 रुपयांनी खरेदी दरात वाढ देणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी ही येत्या 11 जुलैपासून करण्यात येणार आहे.  गोकूळ दूध संघाने व्यवस्थापण खर्चात कमी करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. 

दूध विक्री दरात वाढ

एका बाजूला दूध संघाच्या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. तर दुसऱ्या बाजूला ग्राहकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे. गोकूळने खरेदी दरासह दूध विक्री दरातही वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आता राज्यात एक लीटर दूधामागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ कोल्हापुरचा अपवाद वगळता संपूर्ण राज्यात लागू असणार आहे.  या निर्णयाची अंमलबजावणीही  11 जुलैपासून करण्यात येणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमूलनेही दूध दरात वाढ केली होती.