सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक

विद्यापीठाच्या आयटी विभागानेही या वृत्तास दुजोरा दिला असून याप्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.

Updated: May 7, 2018, 03:00 PM IST

पुणे : शैक्षणीक क्षेत्राला धक्का देणारी अशी ही बातमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून गैरवापर झाल्याची माहिती पुडे येत आहे. विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेस्थळावरून अज्ञात व्यक्तीने इ-मेल पाठवल्याचे प्राथमिक माहितीत उघड होत आहे. विद्यापीठाच्या आयटी विभागानेही या वृत्तास दुजोरा दिला असून याप्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.

दरम्यान, विद्यापीठाची बेबसाईट हॅक झाल्याचे प्रकरण पुढे येत आहेच. पण, त्यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाची वेबसाईट हॅक करून चक्क पेपर फोडल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. एस वाय बीएस सीसी या वर्गाचा लिनीयर अलझेब्रा या विषयाचा पेपर आय टी इंजिनियरिंगच्या मुलांनी हॅक करत पेपर व्हायरल केला आहे. आदेश चोपडे आणि चिनमय अट्र अट्रावलकर या दोन विदयार्थ्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.