शिवसेना शाखा प्रमुखाच्या दादागिरी

शिवसेना शाखा प्रमुखाच्या दादागिरीचा एक व्हिडिओ समोर आलाय.

Updated: Sep 30, 2018, 03:26 PM IST
शिवसेना शाखा प्रमुखाच्या दादागिरी title=

पालघर : वसईतल्या शिवसेना शाखा प्रमुखाच्या दादागिरीचा एक व्हिडिओ समोर आलाय. रुपेश भोईर, असे या शिवसेना शाखा प्रमुखाचे नाव आहे. रुपेश भोईरने वसईतल्या प्रिन्स ढाब्यावर जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. हा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

२५ तारखेला रुपेश भोईर या ढाब्यावर आला. तिथे त्याने बुर्जी पावची ऑर्डर दिली. मात्र दिलेली ऑर्डर उशिरा आल्याने चिडलेल्या रुपेश भोईरने ढाब्यावरच्या कर्मचाऱ्यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. यात ढाब्यातले दोन कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी रुपेश भोईरला अटक केलीय. या आधीही त्यानं अशाच प्रकारे या ढाब्यावर मारहाण केल्याचा आरोप प्रिन्स ढाब्याच्या मालकाने केलाय.