प्रियकराच्या पत्नीवर सर्पमित्राच्या मदतीने साप सोडला...आणि...

आपल्या प्रियकराच्या पत्नीवर एका सर्पमित्राच्या साथीनं नाग सोडल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

Jaywant Patil Updated: Mar 31, 2018, 12:41 AM IST
प्रियकराच्या पत्नीवर सर्पमित्राच्या मदतीने साप सोडला...आणि... title=

नाशिक : आपल्या प्रियकराच्या पत्नीवर एका सर्पमित्राच्या साथीनं नाग सोडल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. वडाळा नगर परिसरात ही महिला राहाते. पल्लवी भालेराव आणि सर्पमित्र किरण गांगुर्डे यांनी आपल्या अंगावर साप सोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार महिलेनं केली आहे. या महिलेच्या हाताला दोन वेळा दंश केला. ही घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. 

साप सोडणारे आरोपी अजूनही फरार

मात्र आता सर्व पुरावे सदर झाल्यामुळे फिर्याद दाखल करून घेण्यात आली आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून मुंबई नाका पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पल्लवी आपल्या प्रियकरानं दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यामुळे नाराज होती. पीडित महिलेने गुरुवारी याबाबत तक्रार दिली.