SRPFच्या भरतीत घोटाळा, डमी उमेदवाराने दिली परीक्षा

Dummy candidates in SRPF recruitment : एसआरपीएफच्या भरतीत डमी उमेदवार असल्याचे उघड झाले आहे.  

Updated: Apr 1, 2022, 08:38 AM IST
SRPFच्या भरतीत घोटाळा, डमी उमेदवाराने दिली परीक्षा title=

नागपूर : Dummy candidates in SRPF recruitment : एसआरपीएफच्या भरतीत डमी उमेदवार असल्याचे उघड झाले आहे. नागपूर शहर पोलीस दलासह एसआरपीएफ भरती प्रक्रियेत डमी उमेदवाराने परीक्षा दिल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कमलसिंह सिंगल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल (SRPF) मध्ये रिक्त पदांसाठी भरती  करण्यात येणार होती. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात येत होती. (SRPF Recruitment) सप्टेंबर 2019 दरम्यान एसआरपीएफ शिपाई भरती प्रक्रिया झाली, यासाठी सदरमधील अंजुमन हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये लेखी परीक्षा केंद्र होते. या केंद्रावरील सीसीटीव्ही पाहणीत लेखी परीक्षेला कमलसिंह होता तर मैदानी परीक्षेला त्याच्या नावे अन्य युवकाने परीक्षा दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

यापूर्वी पोलीस भरती, राज्य राखीव पोलीस दल यांच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षामध्येही बोगस उमेदवारांनी परीक्षा दिल्याचे समोर आले आहे. सुमारे दहा ते बारा लाख रुपये देऊन डमी परीक्षा देत असल्याचे यापूर्वीच या तपासात उघडकीस आले, अशी माहिती एसीपी माधुरी बाविस्कर यांनी दिली.