मनमाडमधील रेल्वे कारखान्याला कच्च्या मालाचा पुरवठा बंद, अस्तित्व धोक्यात

 रेल्वेचा मनमाडमधील कारखान्याचे अस्तित्व धोक्यात आलेय. शेकडो कामगार इथं  काम करतात. मात्र गेल्या काही महिन्यापासून कारखान्यात कच्च्या  मालाचा पुरवठा बंद करण्यात आलाय.

Updated: May 12, 2018, 08:39 AM IST
मनमाडमधील रेल्वे कारखान्याला कच्च्या मालाचा पुरवठा बंद, अस्तित्व धोक्यात title=

नाशिक : रेल्वेचे पुल बनविण्यासाठी लागणारे गर्डर, नटबोल्ट यासह इतर सर्व वस्तू तयार करणारा रेल्वेचा मनमाडमध्ये ब्रिटीश कालीन कारखाना आहे.  शेकडो कामगार इथं  काम करतात.  मात्र गेल्या काही महिन्यापासून कारखान्यात कच्च्या  मालाचा पुरवठा बंद करण्यात आल्याने या कारखान्याचे अस्तित्व धोक्यात आलंय.

 शिवाय कारखान्यातील मशिनरी जुनाट झाल्या असल्याने त्या बदलण्यात याव्या अशी वारंवार मागणी करण्यात आली मात्र सर्व मागण्याकडे रेल्वे प्राशासन दुर्लक्ष करीत असल्याचे पाहून कामगार संघटनानी आंदोलनचे हत्यार उपसले आज त्यांनी मोर्चा काढून अन्नत्याग आंदोलन केले.