'ललित पाटील प्रकरणात दादा भुसेंचा हात', सुषमा अंधारेंच्या आरोपावर भुसे म्हणतात, 'माफी मागा नाहीतर...'

Maharastra Politics : सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी असा आरोप करण्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंचा सल्ला घेतला असता तर बरं झालं असतं, असं दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले आहेत.

Updated: Oct 10, 2023, 06:17 PM IST
 'ललित पाटील प्रकरणात दादा भुसेंचा हात', सुषमा अंधारेंच्या आरोपावर भुसे म्हणतात, 'माफी मागा नाहीतर...' title=
Sushma Andhare vs Dada Bhuse

Sushma Andhare vs Dada Bhuse : ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) पळून जाण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला होता. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी थेट दादा भुसे (Dada Bhuse) यांचं नाव घेत गंभीर आरोप केला आहे.  देवेंद्र फडणवीस ठामपणे भूमिका का घेत नाहीत? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. ललीत पाटील फरार होतानाचे दादा भुसे यांचे जिओग्राफीकल लोकेशन, फोन कॉल्स तपासले तर सर्व सत्य समोर येईल, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. त्यावेळी झी 24 तासच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यामध्ये खडाजंगी पहायला मिळाली.

काय म्हणाले दादा भुसे?

सुषमा अंधारे यांच्या आरोपाची (Sasoon Hospital Drug Racket) चौकशी झाली पाहिजे. त्यांनी असा आरोप करण्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंचा सल्ला घेतला असता तर बरं झालं असतं. ते माझ्यासारख्या शिवसैनिकांना ओळखतात. त्यांनी केलेल्या आरोपाची माफी मागितली नाही, तर त्यांच्यावर कारवाई करणार, असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे.

लाईव्ह कार्यक्रमात खडाजंगी

दादा भुसे यांच्यावर संशयाची सुई असेल तर चौकशीला सामोरं जावं, असं आव्हान सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यानंतर दादा भुसे आणि सुषमा अंधारे यांच्यात झी 24 तासच्या कार्यक्रमात खडाजंगी सुरू झाली.  सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावर बोलणार एवढ्या तुम्ही महान नाहीत, असं दादा भुसे यांनी म्हटलंय. तर तुम्ही सुचना आणि इशारे देताय, त्याला धमकी म्हणायची का? असा सवाल अंधारे यांनी विचारला.

 माझा फोन आत्ता घेऊन जा.. चौकशीतून काहीही समोर आलं नाही तर मालेगावच्या जनतेशी तुम्हाला माफी मागावी लागेल, असं दादा भुसे म्हणाले आहेत. त्याचबरोबर भुसे यांनी सुषमा अंधारे यांना 8 दिवसाचा अल्टिमेटम देखील दिलाय.

दरम्यान, ललित पाटील ससून रुग्णालयातून पळाल्यावर भूषण पाटील देखील फरार होता. त्याला शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र या दोघांना अटक करण्यात पोलिसांना (Pune Police) यश आलं आहे. मात्र ललित पाटील अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.