रेल्वे स्टेशन परिसरात बाईक, कार पार्क करताय, तर....

ठाणे स्टेशन परिसरात तुम्ही चार चाकी किंवा दुचाकी पार्क करत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 21, 2017, 11:58 PM IST
रेल्वे स्टेशन परिसरात बाईक, कार पार्क करताय, तर.... title=

ठाणे : ठाणे स्टेशन परिसरात तुम्ही चार चाकी किंवा दुचाकी पार्क करत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. 

ठाण्यात स्टेशन परिसरात आता दुचाकीही पार्क करता येणार नाही. एल्फीन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि ठाणे वाहतूक शाखेने हा निर्णय घेतलाय. 

ठाणे स्टेशन परिसरातून रोज जवळपास सात लाख लोक प्रवास करतात. त्यामुळे गर्दी नियंत्रण करण्यासाठी हे असे निर्णय घेणं गरजेचं होतं. त्यामुळे यापुढे स्टेशन परिसरात गाडी पार्क कराल तर १०० रूपये दंड होणार आहे. नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केले आहे.