मृतदेह सेलोटेपने पॅक करण्यात आला आणि... मुंब्रा रेती बंदर परिसरात खळबळ

अचानक दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी पोलिसांनी बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला असता मृतदेह आढळून आला. मुंब्रा परिसरात खळबळ उडाली आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 27, 2023, 10:23 PM IST
मृतदेह सेलोटेपने पॅक करण्यात आला आणि... मुंब्रा रेती बंदर परिसरात खळबळ  title=

Mumbai Crime News :  ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.   कपड्यात गुंडाळून सेलो टेपमे हा मृतदेह पॅक करण्यात आला आहे. मृतदेहाचा अवस्था पाहून या महिलेची हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवली आहे. मुंब्रा पोलिस या प्रकरणाचा अधित तपास करत आहेत. 

ठाण्यातील मुंब्रा येथील रेती बंदर परिसरात हा मृतदेह आढळून आला आहे. कपड्यात आढळलेला मृतदेह हा दोन ते तीन दिवस जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेची हत्या केल्यानंतर तिला कपड्यात गुंडाळून त्याला सेलोटेप गुंडाळून कोणालाही संशय येऊ नये अशा पद्धतीने हा मृतदेह पॅक करण्यात आला आहे.

दुर्गंधी आल्याने मृतदेह उघडकीस आला

आतापर्यंत मृत महिलेची ओळख पटलेली नाही. स्थानिक लोकांना प्रथम हा कचरा असल्याचे वाटले. मात्र, त्यातून दुर्गंध आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांना घटनास्थळी घेऊन पाहणी केली असता त्या कपड्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या मृत महिलेचे वय अंदाजे 20 ते 25 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेह सापडलेल्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. प्रकरणाचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. 2 ते 3 दिवसांपूर्वी या महिलेची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. कुणाला संशय येऊ नये यासाठी मृतदेह कपड्यात गुंडाळून सेलोटेपने पॅक केला असावा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

खिशातून मोबाईल काढल्याच्या रागातून मित्रानेच केली मित्राची हत्या 

पिंपरी चिंचवड शहराच्या भोसरी एमआयडीसीत खिशातून मोबाईल काढल्याच्या रागातून मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. या प्रकरणी आरोपी अमर उर्फ एक्याला पोलिसांनी अटक केली. नारायण वाघमारे असं मृत तरूणाचं नाव आहे. अमरने नारायणला दगडाने मारहाण केली होती, त्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

वृद्धाची दगडानं ठेचून हत्या

विरारच्या मांडवी परिसरात 75 वर्षीय वृद्धाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. भिवा वायडा असं या वृद्धाचं नाव आहे. त्यांची नेमकी हत्या कोणी केली याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय, मात्र या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.