विदर्भात पुढचे तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट

सातत्यानं वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. सकाळपासून उन्हाचे चटके जाणवत असून रस्त्यावरती वाहतूकही कमी झालेली आहे.

Updated: May 20, 2018, 01:57 PM IST
विदर्भात पुढचे तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट title=

नागपूर: विदर्भात तापमान चांगलंच वाढलय. नागपुरात आज (रविवार, २० एप्रिल) पारा ४६.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे. चंद्रपुरात तर सूर्य आग ओकत असून तिथे ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदानुसार पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट राहणार असून विदर्भात पारा ४७ अंश सेल्सिअसपर्यंच पोहचण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं अघड झालं असून सकाळपासूनच ऊन्हाचे चटके जाणवत असल्यानं रस्त्यावरं वाहतूकही कमी दिसतेय.

उष्णतेमुळे नागरिक हैराण

विदर्भात तीव्र उष्णतेमुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. लहान मुले, जनावरे, ज्येष्ठ नागरिकही या उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट राहणार आहे. विदर्भात अजून काही ठिकाणी पारा ४७ डीग्रीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. सातत्यानं वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. सकाळपासून उन्हाचे चटके जाणवत असून रस्त्यावरती वाहतूकही कमी झालेली आहे.

आरोग्याची काळजी घ्या

कामाशीवाय दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडणे टाळा. उन्हातून प्रवास करताना डोक्यावर टोपी, कापड घ्या. डोळयांवर गॉगल वापरा. अतीशीत पदार्थ टाळा. तहान लागली नसली तरीही अधिक पाणी प्या. थकवा, चक्कर, घसा कोरडा पडणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करा, असे अवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून केले जात आहे.