चोरी करायला आला आणि जीव गमावला

शहरातील शामनगर भागात मंगळवारी रात्री उशिरा चोरी आणि हत्येच्या थरार पाहायला मिळाला. चोरी करण्यासाठी हलदर कुटुंबियांच्या घरी आलेल्या २ चोरट्यांवर घरच्या सदस्यांनी त्यांच्याच चाकूने वार केले.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 6, 2017, 06:20 PM IST
चोरी करायला आला आणि जीव गमावला title=

चंद्रपूर : शहरातील शामनगर भागात मंगळवारी रात्री उशिरा चोरी आणि हत्येच्या थरार पाहायला मिळाला. चोरी करण्यासाठी हलदर कुटुंबियांच्या घरी आलेल्या २ चोरट्यांवर घरच्या सदस्यांनी त्यांच्याच चाकूने वार केले.

यात उत्तरप्रदेशातल्या बनारस इथल्या रितेश गुप्ता याचा मृत्यु झाला तर स्थानिक रहिवासी चोर पंकज ठाकूर जखमी झालाय. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाल्य्यानंतर घरच्या ४ सदस्यांना पोलिसांनी हत्या प्रकरणी अटक केली आहे. घरात शिरलेल्या चोरट्याचा मुकाबला करताना झालेल्या झटापटीत चोरट्यांचा मृत्यू झाला मात्र घराच्या सदस्यांनाच आरोपी ठरवलं गेल्यामुळे चंद्रपूर परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पाहा व्हिडिओ