टोमॅटोला कवडीमोल दर, शेतकर्‍याने ट्रकभर रस्त्यावर दिले फेकून

 farmers crisis :पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले असून त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

Updated: Aug 21, 2021, 12:12 PM IST
टोमॅटोला कवडीमोल दर, शेतकर्‍याने ट्रकभर रस्त्यावर दिले फेकून  title=

औरंगाबाद :  farmers crisis :पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले असून त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांने (farmers0 टोमॅटो ( tomatoes) रस्त्यावर फेकले. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील केकत जळगावची आहे.

गणेश अजीनाथ थोरे शेतकऱ्याने टोमॅटो मालाला योग्य भाव न मिळाल्याने घेतलेले पीक रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली. या शेतकर्‍यांने ट्रकभर टॉमेटो रस्त्यावर फेकले. टॉमेटो फेकल्यानंतर त्या ठिकाणावर जनावरे चरताना दिसत होती.

औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील केकत जळगाव या गावात टोमॅटोचे चांगले पीक आले आहे. पण टोमॅटोचे भाव मात्र कोसळले आहेत. अगदी दोन ते तीन रुपये किलो टोमॅटोला अल्प भाव मिळत आहे. (Three to four rupees per kg of tomatoes) त्यामुळे शेतकर्‍यांना टोमॅटोची वाहतूक करणेही परवडत नाही. जेवढा खर्च त्यांच्या उत्पादनाला लागला, तेवढा खर्चही निघत नाही, अशी खंत या शेतकऱ्यांने व्यक्त केली. शिवाय पाऊस असल्याने मोठ्या शहरांत दूरपर्यंत टोमॅटोची वाहतूक सुद्धा करता येत नाही, असे शेतकऱ्याने सांगितले.