भाजप नगरसेवकाकडून खंडणीसाठी व्यावसायिकाला मारहाण

हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी मारहाण करणारा भाजप नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे.

Updated: Aug 14, 2018, 05:03 PM IST
भाजप नगरसेवकाकडून खंडणीसाठी व्यावसायिकाला मारहाण title=

नवी मुंबई : खारघरमध्ये हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी मारहाण करणारा भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे याला अटक करण्यात आली आहे. तर काकडेसह इतर चार आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

खारघर पोलीसांकडूनही अटकेची कारवाई करण्यात आली. सोमवारी दुपारी हॉटेल व्यावसायिक ईस्माईल शेख यांना भाजप नगरसेवक शत्रुघ्न  काकडे यांनी मारहाण केली. खंडणीसाठी ही मारहाण झाल्याचा आरोप काकडे याच्यावर आहे. सीसीटीव्हीमध्ये ही मारहाण कैद झाली आहे.