बहिणीला छेडल्याचे सांगत दोघांनी तरुणाला मारहाण करत १६ लाख लुटले

कंपनीची रोकड बँकेत जमा करण्यासाठी जाणाऱ्या एकाला अडवून सोळा लाख रुपये लुटल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला.  

Updated: Mar 29, 2019, 08:35 AM IST
बहिणीला छेडल्याचे सांगत दोघांनी तरुणाला मारहाण करत १६ लाख लुटले title=

ठाणे : कंपनीची रोकड बँकेत जमा करण्यासाठी जाणाऱ्या एकाला अडवून सोळा लाख रुपये लुटल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला. बहिणीला छेडल्याचे कारण देत दोन तरुणांनी शशिकांत चव्हाणला वाटेत अडवले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्याच दुचाकीवर बसवून पोलीस स्टेशनला नेण्याच्या बहाण्याने या दोघांनी त्याला निर्जनस्थळी नेले. तिथू नेऊन त्याच्याकडील सोळा लाख रुपये हे घेऊन हे दोघे चोरटे पसार झाले. 

याप्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कल्याण गुन्हे शाखेने सीसीटीव्ही दृष्यांच्या मदतीने या गुन्ह्यांचा छडा लावला. पोलिसांनी लखन रोकडे, प्रतीक अहिरे, योगेश राजवळ या तिघांना बेड्या ठोकल्यात. या संपूर्ण घटनेचा सूत्रधार योगेश राजवळ हा आहे. योगेश हा आधी त्याच कंपनीमध्ये कामाला होता. त्यांच्या जवळून पोलिसांनी १४ लाख ८० हजार रोकड व तीन मोटर सायकल जप्त केल्या आहेत.