उद्धव ठाकरेंचा हितेंद्र ठाकूर यांना 'हा' कानमंत्र

Updated: May 24, 2018, 09:02 PM IST

पालघर : पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारा दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची आपले प्रतिस्पर्धी असलेल्या बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्याशी भेट झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी गाडीतूनच हितेंद्र ठाकुरांशी संवाद साधला.

दोघांमध्ये चेष्टा-मस्करी झाली. हितेंद्र ठाकूरांना जवळ घेत उद्धव ठाकरे त्यांच्या कानात काहीतरी कुजबुजले. मात्र, आपलाच उमेदवार निवडून येणार असं मोठ्या विश्वासानं हितेंद्र ठाकूरांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. पण यावर कडी करत तुम्ही भगवा घेऊन या आम्ही शिट्टी वाजवत येतो असं मिश्कील टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.