सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार; शिवसेनेचा खडा सवाल

... तरीही जानकर बोलले

Updated: Aug 27, 2019, 09:18 AM IST
सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार; शिवसेनेचा खडा सवाल  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा येत्या काळात राष्ट्रीय समाज पक्ष अर्थात रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचं महादेव जानकर यांनी जाहीर केलं. पण, या घोषणेनंतर त्यांच्याकडूनच याप्रकरणी सारवासारवही करण्यात आली. या सर्व प्रकारावर आणि महादेव जानकर यांच्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार? असा थेट सवाल सामनातील अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. 

संजय दत्तच्या रासप प्रवेशाविषयी वक्तव्य करत सामनातून शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. संजुबाबा जर रासपमध्ये जाणार असेल, तर शाहरुख खान आणि अक्षय कुमार रामदास आठवलेंच्या पक्षात जातील.इतकच नव्हे, तर सलमानसारखी मंडळी आंबेडकर- ओवेसींसारख्या वंचित आघाडीत प्रवेश करण्यासाठीचे अर्ज करतील, अशी कोपरखळीही या अग्रलेखातून मारण्यात आली. 

धनगर समाजासाठी आखण्यात आलेल्या कैक योजना अद्यापही कागदावच आहेत, असं म्हणत आता धनगर समाजाच्याया प्रश्नांना वाचा फोडलीच गेली पाहिजे असा कळकळीचा सूर अग्रलेखातून आळवण्यातस आला आहे. मुख्य म्हणजे वर्षानुवर्षे धनगर समाजाच्या या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संजय दत्त किंवा इतर सेलिब्रिटी येणाने काही फायदा होणार आहे का, हाच प्रश्न शिवसेनेकडून प्रकर्षाने मांडण्यात येत आहे. 

 पुणे, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती आणि नवी मुंबई येथे धनगर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधण्याची योजना जाहीर केली. त्या उद्देशाने जवळपास दीडशे कोटी रुपयांची तरतूदही केली. पण, त्यातील किती वसतिगृहांचं काम सुरू झालं? असा प्रश्न अग्रलेखातून मांडण्यात आला.