Valentine day 2023: दहा वर्षांची दोस्ती अन् जडलं प्रेम, अशी आहे 'राज'पुत्राची Love Story!

Amit Thackeray, Mithali Borude: मिताली आणि अमित ठाकरेंच्या प्रेमाची खबर राज ठाकरेंना लागली. दोघांनी घरी प्रेमाची कबुली दिली. त्यावेळी...

Updated: Feb 14, 2023, 01:46 PM IST
Valentine day 2023: दहा वर्षांची दोस्ती अन् जडलं प्रेम, अशी आहे 'राज'पुत्राची Love Story! title=
Amit Thackeray Love Story

Valentine Day Special Story: प्रेमीयुगुलांसाठी सर्वात महत्त्वाचा असा आजचा व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day)... म्हणजेच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. जगभरात हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. एवढंच काय तर अनेक देशात आजचा दिवस साजरा करता यावा यासाठी साप्ताहिक सुट्टी देखील दिल्या जातात. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असं म्हणतात. राजकारणांची देखील लव्ह स्टोरी (Love Story) असते. याचं ताजं उदाहरण म्हणजे 'राज'पुत्र आणि मनसे युवानेते अमित ठाकरे.. (Valentine day 2023 Love story of Amit Thackeray and Mithali Borude political special know the details)

अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि मिताली बोरूडे (Mithali Borude) यांचा विवाह 27 जानेवारी 2019 रोजी झाला होता. हा विवाह सोहळा परळ येथील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये धमाकेदार अंदाजात पार पडला होता. राज ठाकरे (Raj Thackeray) यांची धाकटी कन्या उर्वशी ठाकरे आणि मिताली बोरूडे या चांगल्या मैत्रिणी असल्याने दोघीं नेहमी भेटायचे. कृष्णकुंजवर मितालीचं येणं जाणं सुरू असायचं. तर दुसरीकडे मुंबईतील पोदार कॉलेजच्या कॉमर्स शाखेत शिकणाऱ्या अमित ठाकरे यांची ओळख कॉलेज कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या मिताली बोरूडेशी झाली. 

अमित ठाकरे आणि मिताली यांची मैत्री झाली. परिवाराची ओळख असल्याने त्यांची मैत्री आणखी पक्की झाली. मिताली ही मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे (Sanjay Borude) यांच्या कन्या. मितालीने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं. अमित ठाकरे यांनी मितालीला वेळोवेळी मदत देखील केली. हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात होत होतं. त्याचकाळात अमित ठाकरे आजारी पडले. 2017 साली अमित ठाकरे यांना आजाराने ग्रासलेलं असताना मितालीने अमित ठाकरे यांची खूप काळजी घेतली. राज ठाकरे यांनी देखील राजकारणातून हात बाजूला काढला होता. त्यांना आजारातून बाहेर काढण्यासाठी मितालीने कोणतीही कसर सोडली नाही.

आणखी वाचा  - पहाटेच्या शपथविधीवरुन देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, अमित ठाकरे यांनी मितालीला (Amit Thackeray Love Story) प्रपोज केलं. अमित ठाकरेंचा स्वभाव माहिती असल्याने मितालीने त्यांना लगेच होकार देखील कळवला. त्याचवेळी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांना दोघांच्या प्रेम प्रकरणाची खबर लागली. दोघांनी घरी प्रेमाबद्दलची कबुली दिल्यानंतर घरच्यांनी देखील होकार कळवला आणि 27 जानेवारी 2019 रोजी दोघांनी सात जन्माची गाठ बांधली.