कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास

Mumbai to Goa Vande Bharat Express:  मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी हायस्पीडमध्ये रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची यशस्वी चाचणी घेतली गेली आहे. आता गोव्याहून ही एक्स्प्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने धावणार आहे. राज्यात मुंबई-शिंर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर वंदे भारत धावत आहे.आता कोकण रेल्वे मार्गावर ही नवी कोरी गाडी धावणार आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: May 16, 2023, 11:24 AM IST
कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास title=

Mumbai to Goa Vande Bharat Express Travel : कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्यांना एक चांगली बातमी. कोकणात आता वंदे भारत एक्स्प्रेसने जाता येणार आहे. कारण कोकण रेल्वे मार्गावरुन वंदे भारत एक्स्प्रेस धावली आहे. मुंबईपासून गोव्याच्या दिशेने करण्यात आलेली प्राथमिक चाचणी यशस्वी ठरली आहे. आता गोव्याहून ही एक्स्प्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने धावणार आहे. तेव्हा लवकरच कोकण रेल्वेवरही वंदे भारत धावताना दिसू शकेल. आता राज्यात मुंबई-शिंर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर वंदे भारत धावत आहे. आता कोकण रेल्वे मार्गावर ही नवी कोरी गाडी धावणार आहे. त्यामुळे प्रवास एकदम आरामदायी होणार आहे.

आता मुंबई टू गोवा वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास । चाचणी यशस्वी

वंदे भारत एक्स्प्रेसचा180 किमी प्रति तास वेग 

मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी हायस्पीडमध्ये रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी घेतली गेली आहे. मुंबई ते मडगाव मार्गावर आज मंगळवारी यशस्वी चाचणी घेतली गेली आहे. या वंदे भारत रेल्वेचाचा वेग चांगला असल्याने कमी वेळात गोव्यात पोहोचता येणार आहे. या गाडीचा कमाल 180 किमी प्रति तास वेग आहे. या अत्याधुनिक रेल्वेमध्ये जीपीएस बेस्ड पॅसएंजर इन्फॉर्मेशन सीस्टम, बायो व्हॅक्युम टॉयलेट्स, अ‍ॅटोमेटिक दरवाजे, वायाफाय आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम आहे. 

मुंबई ते गोवा या एक्सप्रेसने आरामदायी प्रवास

देशातील पहिली तेजस एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावली होती. ही एक्स्प्रेस सुरु आहे. तसेच डबल डेकर रेल्वेही या मार्गावर सुरु करण्यात आली होती. आता मुंबई ते गोवा वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. त्यामुळे आरामदायी प्रवास करता येणार आहे. देशभरातील विविध मार्गांवर ‘मेक इन इंडिया’अंतर्गत भारतात विकसित केलेली वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागली आहे. 16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवारी पहाटे 5.35 वाजता सीएसएमटी स्थानकातून सुटली. ती गोव्यात मडगावला दुपारी 2.30 वाजता पोहोचणे अपेक्षित आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस ही भारतीय बनावटीची असून देशातील सध्याची अत्यंत प्रतिष्ठेची रेल्वे असल्यामुळे तिच्या चाचणीदरम्यान रेल्वेच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑपरेटिंग, एस अॅण्ड टी सुपरवायझर या सर्वांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या  होत्या. त्यानुसार कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामुळे ही गाडी लवकरच कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. संपूर्ण वातानुकुलित गाडी आहे.