सरपंचपदासाठी थेट निवडणूक, पहिल्या टप्प्यात शांततेत मतदान

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं. 

Updated: Oct 7, 2017, 07:08 PM IST
सरपंचपदासाठी थेट निवडणूक, पहिल्या टप्प्यात शांततेत मतदान  title=

मुंबई : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं. 

पहिल्या टप्प्यात विविध 18 जिल्ह्यांतल्या 3 हजार 884 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. नगरपालिकांप्रमाणे पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे. 

मतदान शांततेत पार पडावं यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस दल सज्ज होतं. 

9 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्याची मतमोजणी होणार आहे. तर दुस-या टप्प्यातलं मतदान 14 तारखेला होणार आहे. राज्यातल्या फडणवीस सरकारला तीन वर्षं पूर्ण होत असताना, साडे सात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमधून जनतेचा कौल काय आहे हे स्पष्ट होणार आहे.