वर्ध्यात मुख्याध्यापकाकडून दोन अल्पवयीन विद्यार्थींनीवर अत्याचार, दोन गुन्हे दाखल

सिंदीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकाने दोन मुलींचं लैंगिक शोषण केले आहे. 

Updated: Feb 11, 2020, 10:34 PM IST
वर्ध्यात मुख्याध्यापकाकडून दोन अल्पवयीन विद्यार्थींनीवर अत्याचार, दोन गुन्हे दाखल  title=
संग्रहित छाया

वर्धा : सिंदीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकाने दोन मुलींचं लैंगिक शोषण केले आहे. शाळेतील अकरा आणि आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करत लैंगिक शोषण केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या घटनेची सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापक शिक्षक सतीश बजाईत (४८) याला अटक करण्यात आली आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळेत या दोन्ही विद्यार्थिनी शिकत असून एक पाचवी तर दुसरी तिसर्‍या वर्गाची विद्यार्थ्यांनी असल्याचे सांगितले जात आहे. याच शाळेत सतीश या शिक्षकाने या दोन्ही विद्यार्थीनीवर वाईट नजर ठेवून आठ वर्षीय बालिकेवर मागील तिन महिन्यांपासून तीन ते चार वेळा अत्याचार केले. शेवटी वेदना असह्य झाल्यावर या मुलीने शाळेत जायला नकार दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. तर दुसर्‍या अकरा वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केलेत. हा प्रकार या मुलीने आईवडिलांना सांगितल्यानंतर या शिक्षकाचे अत्याचार पुढे आला.

शिक्षण क्षेत्रातही मुली सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत असून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचे कृत्य या शिक्षकाने केल्याने गावात शिक्षकाप्रती कमालीचा रोष दिसून येत आहे. याप्रकरणी सिंदी पोलीसात या शिक्षकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सिंदी रेल्वे पोलिसात नराधम शिक्षकांच्या विरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एका प्रकरणात कलम ३७६ (अ, ब) पॉस्को कलम ६ अंतर्गत तर दुसऱ्या प्रकरणात कलम ३५४ (अ) आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा जिल्हापरिषद शाळेचा शिक्षक आणि मुख्याध्यापक देखील आहे. घटनेचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रीती आडे या करत आहेत.