Weather Update : अरे देवा! पुन्हा पाऊस, होळीपूर्वी 'या' राज्यात 4 ते 6 मार्चदरम्यान पावसाची शक्यता

Weather Update : होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महाराष्ट्रात पावसाची (Maharashtra Weather Update) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 4 ते 6 मार्चदरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरी कोसळ्याती शक्यता आहे.

Updated: Mar 3, 2023, 07:26 AM IST
Weather Update : अरे देवा! पुन्हा पाऊस, होळीपूर्वी 'या' राज्यात 4 ते 6 मार्चदरम्यान पावसाची शक्यता title=
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : राज्यात फेब्रुवारी महिन्यात पारा 40 पर्यंत पोहोचला होता. दिवसा उष्णतेची लाट तर रात्री थंडीची चाहूल असताना आता त्यात पावसाची पण भर पडली आहे. होळीच्या (Holi 2023) आधी महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 4 ते 6 मार्च दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाती शक्यता आहे.  

मार्च मे महिन्यात कडाक्याचे ऊन पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला होता. त्यातच आता हवामान विभागाने राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान मागील काही वर्षात तापमाना होत असलेली वाढ चिंतेचा विषय ठरते. त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येईल, असा अंदाज वर्तवला होता. पण उन्हाळा सुरू होण्याआधीच पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. 

या राज्यात पावसाची शक्यता

दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पावसाचा (Maharashtra Weather Update) अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परिणामी उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तसेच उत्तर कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 5 मार्चला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो. तर विदर्भात 6 मार्चला सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर कोकणात सुद्धा पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात सुद्धा कमाल तापमानात सरासरीपेक्षा 2-3 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

उन्हाळ्यात तापमान उच्चांकावर असेल?

यंदा संपूर्ण देशात थंडीची लाट होती त्याहून जास्त तीव्र उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. परिणामी यंदा उन्हाळ्यात तापमान उच्चांकावर पोहोचलेले दिसेल. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 5 दिवसांमध्ये उत्तर पश्चिम आणि मध्य-पूर्व भारतामध्ये कमाल तापमानात 3 ते 5 अंशांची वाढ अपेक्षित आहे.