नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या विकास ठाकरेंची संपत्ती किती?; 5 वर्षात काँग्रेस उमेदवाराचा जोरादार 'विकास'!

Loksabha Election 2024 : खासदार नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या आमदार विकास ठाकरेंची संपत्तीचा आकडा ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. संपत्ती साडेचार वर्षात 63 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा आकडा नितीन गडकरींच्या संपत्तीपेक्षा अधिक आहे. 

नेहा चौधरी | Updated: Mar 28, 2024, 08:09 AM IST
नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या विकास ठाकरेंची संपत्ती किती?; 5 वर्षात काँग्रेस उमेदवाराचा जोरादार 'विकास'! title=
What is the wealth of Vikas Thackeray who contested against Nitin Gadkari in nagpur loksabha constituency

Vikas Thakre Net Worth : लोकसभा निवणडणूक महाराष्ट्रातील महत्त्वाचा मतदारसंघ आणि भाजपचा गड नागपूरकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय. इथे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि काँग्रेसचा आमदार विकार ठाकरे यांच्यामध्ये लढत रंगणार आहे. विकास ठाकरे हे नागपूर पश्चिमचे आमदार, काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. 2002 मध्ये नगरसेवक, महापौर, महापालिकेत विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि त्यानंतर 2019 मध्ये पश्चिम नागपूरमधून आमदार असा विकास ठाकरे यांचा राजकीय प्रवास झाला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते विलासराव मुत्तेमवार यांचे कट्टर समर्थक म्हणून विकास ठाकरे यांची ओळख आहे. (What is the wealth of Vikas Thackeray who contested against Nitin Gadkari in nagpur loksabha constituency)

संपत्ती साडेचार वर्षात 63 टक्क्यांनी वाढ !

लोकसभा निवडणूक पहिल्या टप्प्यात नागपूरमध्ये मतदान होणार आहे. नितीन गडकरी आणि विकास ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केलंय. यात संपत्तीचा आकडा जाहीर करण्यात आला असून गेल्या साडेचार वर्षात ठाकरेंच्या संपत्ती 63 टक्क्यांनी वाढ झालीय. या शपथपत्रात ठाकरे कुटुंबाची एकूण संपत्ती ही 9 कोटी 45 लाख 37 हजार 481 रुपये दाखवण्यात आलीय. तर 2019 मधील निवडणुकीच्या वेळी त्यांची संपत्ती ही 6 कोटी 54 लाख 12 हजार 43 रुपये एवढी दाखवण्यात आली होती. याचा अर्थ साडेचार वर्षात 2 कोटी 91 लाख 25 हजार 438 रुपयांनी संपत्तीत भर पडली आहे. 

विकास ठाकरेंवर एवढं कर्ज!

त्याशिवाय विकास यांच्याकडे 121 ग्रॅम सोनं असून त्याची किंमत ही 4 लाख 65 हजार 800 रुपये एवढी आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 413 ग्रॅम सोनं असून त्याची किंमत 14 लाख 52 हजार रुपये असल्याचा शपथपत्रात दाखविण्यात आलंय. या शपथपत्रात वाहन आणि बचन अशी चल संपत्ती ठाकरेंच्या नावावर 1 कोटी 29 लाख 65 हजार 185 रुपये तर पत्नीनावर 1 कोटी 42 लाख 9 हजार 629 रुपये आहेत.

स्थावर मालमत्ता विकास ठाकरेंच्या नावावर - 69 लाख 10 हजार

स्थावर मालमत्ता पत्नीच्या नावावर - 6 कोटी 66 हजार 71 हजार 67 रुपये

विकास ठाकरेंवर कर्ज - 1 कोटी 51 लाख 41 हजार 813 रुपये

पत्नीच्या नावावर कर्ज - 1 कोटी 41 लाख 16 हजार 256 रुपये

विकास ठाकरेंवर गुन्ह्याचीही नोंद!

दरम्यान, विकास ठाकरे यांच्यावर 2017 पासून आतापर्यंत विविध कलमांतर्गत 20 गुन्ह्यांची नोंद या शपथपत्रात दाखविण्यात आली आहे. अनधिकृतपणे मोर्चा काढणे, शासकीय कामात हस्तपेक्ष करणे, रेल्वेगाडी थांबवण्याचा प्रयत्न करणे, अशा गुन्ह्यांची नोंद असून आतापर्यंत एकाही गुन्ह्यात ते दोषी नाहीत.