Sanjay Raut: जेव्हा एकनाथ शिंदे लक्झेंबर्गच्या पंतप्रधानांना ऑफर देतात, राऊतांनी जोरदार बॅटिंग!

Maharastra Political news: आपण कागदी वाघ नाहीये. शिवसेना हा रक्तातून निर्माण झालेला हा इतिहास आहे. तो शाईन मिटवता नाही येणार, असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

Updated: Jan 23, 2023, 08:22 PM IST
Sanjay Raut: जेव्हा एकनाथ शिंदे लक्झेंबर्गच्या पंतप्रधानांना ऑफर देतात, राऊतांनी जोरदार बॅटिंग! title=
sanjay raut

Sanjay Raut On Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे तोंडभरून कौतुक केलं. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी एक किस्सा सांगितला होता. लक्झेंबर्ग (Luxembourg) देशाचे पंतप्रधान माझ्याकडे आले आणि म्हणाले की, मी मोदींचा भक्त आहे. माझ्यासोबत एक फोटो काढाला का? आणि मोदींना तो फोटो दाखवा, असा किस्सा एकनाथ शिंदे यांनी सांगितला. त्यावर आता संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे (Sanjay Raut On Eknath Shinde) यांना खडेबोल सुनावले. (When Eknath Shinde offers Prime Minister of Luxembourg funny comedy by sanjay raut Maharastra marathi news)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सदैव पक्षप्रमुख राहतील, असं राऊत म्हणाले आहेत. जनतेने दिलेली ही पदे आहेत. आपण कागदी वाघ नाहीये. शिवसेना हा रक्तातून निर्माण झालेला हा इतिहास आहे. तो शाईन मिटवता नाही येणार, असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

कोणीतरी सांगितलं धुवाशाने सांगितलं हे लक्झेंबर्गचे पंतप्रधान (Prime Minister of Luxembourg) आहेत. ते म्हणाले, अरे तुम्ही इथे! हो आम्ही इथे.. तुम्हीही इथं. किती खोके देऊ तुम्हाला? येताय आमच्या पक्षात? तुम्ही मोदींचे भक्त आहात. अहो आम्ही पण मोदींचे भक्त आहोत, असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोले लगावले.

आणखी वाचा - Maharashtra Politics: शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' एका निर्णयामुळे फडणवीस नाराज?

दरम्यान, शिवसेना अभेद्य आहे. दुसरी शिवसेना निर्माण नाही होणार. आपण पुरून ऊरू त्यांना. पक्ष असा चोरता नाही येणार. देवाची मुर्ती चोरणारा तो मुर्ती विकतो. हे मुर्तीचोर आहेत. पावसाळ्यात गांडूळ जन्माला येते व जाते. त्याचे अस्तित्वही दिसत नाही, असंही राऊत यावेळी म्हणाले आहेत. आज चौथे चाक लागलंय. दोन स्टेफनीही तयार आहेत. आम्ही दगडच, हे ४० दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा खणकावून इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय.