तलाठी भरती परीक्षेत गोंधळ का झाला? विखे पाटलांनी स्पष्टच सांगितले...

Talathi Exam 2023: राज्यभरातील 115 टीसीएस केंद्रावर तलाठी भरती परीक्षा निश्चित केली होती.डाटा सेंटर सर्व्हरवर समस्या उद्भवली. त्यामुळे पहिल्या सत्रातील परीक्षा उशीरा सुरु झाल्या आहेत. तशा सूचना विद्यार्थ्यांना दिल्या असून तिन्ही सत्रांमध्ये बदल केले आहेत, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

Pravin Dabholkar | Updated: Aug 21, 2023, 02:18 PM IST
तलाठी भरती परीक्षेत गोंधळ का झाला? विखे पाटलांनी स्पष्टच सांगितले... title=

Talathi Recruitment Exam: राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रावर तलाठी भरती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. पण सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने परीक्षेवेळी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. यानंतर परीक्षेची वेळ पुढे ढकलावी लागली. यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

राज्यभरातील 115 टीसीएस केंद्रावर तलाठी भरती परीक्षा निश्चित केली होती.डाटा सेंटर सर्व्हरवर समस्या उद्भवली. त्यामुळे पहिल्या सत्रातील परीक्षा उशीरा सुरु झाल्या आहेत. तशा सूचना विद्यार्थ्यांना दिल्या असून तिन्ही सत्रांमध्ये बदल केले आहेत, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. 

सर्व निवासी उपजिल्हाधिकारी आणि यंत्रणेतील अधिकाऱ्यांना स्वतः केंद्रावर थांबून सूचना देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व अधिकारी आणि यंत्रणा संपूर्ण परीक्षेवर लक्ष ठेवून असल्याचे विखे पाटील म्हणाले. 

तलाठी भरतीचे आधीच 1 हजार अर्ज शुल्क त्यात परीक्षा केंद्रावरही विद्यार्थ्यांची वेगळी लूट

अतिरिक्त मुख्य सचिवांना या तांत्रिक दोषाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यंना मानसिक त्रास विद्यार्थ्यांना झाला त्याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली.

टीसीएसकडून अपेक्षित नव्हते. त्यांनी पर्यायी यंत्रणा काय केली, हे पाहावे लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. असे असले तरीही कुणीही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही,याची खबरदारी शासनाने घेतल्याचे विखे पाटील म्हणाले. 

Talathi Bharti 2023: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती परीक्षा केंद्रावर गोंधळ

सर्व्हर डाऊन

विद्यार्थ्यांना सकाळी साडे सात वाजता विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते. सकाळी 9 वाजल्यापासून परीक्षा सुरु होणार होता. दरम्यान अनेक केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्यानं परीक्षा खोळंबल्या होत्या. त्यानंतर पावणे अकरा वाजल्यापासून सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा सुरु झाल्या. सकाळी 9 वाजताचा परीक्षेचा पेपर साधारण पावणे-अकराच्या सुमारास सुरु झाला  सकाळपासून बहुतांश जिल्ह्यात तलाठी भरती परीक्षेत गोंधळ उडाला होता. सर्व्हर डाऊन असल्यानं पुणे, नागपूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, अमरावतीत परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला होता. सकाळी 7.30 वाजता परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केंद्रात घेण्यात आलं, मात्र सर्व्हर डाऊन झाल्यानं विद्यार्थी खोळंबले. सुमारे दोन तास सर्व्हरचा गोंधळ नीट होत नव्हता.. त्यामुळे परीक्षेआधीच विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.तलाठी भरती परीक्षेसाठी लातूरमध्येही मोठ्या संख्येने परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. सकाळी नऊ वाजताचा पेपर होता. रिपोर्टींग टाईम सकाळी सातचा होता. परीक्षार्थी सकाळी सहा वाजल्यापासूनच केंद्रावर हजर होते. मात्र त्यांना उडावीउडवीच्या उत्तराला सामोरं जावं लागलं.