पुण्यात वादातून महिलेला कुटुंबासह एका वर्षासाठी केले बहिष्कृत

वादातून  महिलेला कुटुंबासह एका वर्षासाठी बहिष्कृत (Woman boycotted) केल्याची घटना पुण्यात (Pune) घडली आहे.  

Updated: Dec 4, 2020, 06:11 PM IST
पुण्यात वादातून महिलेला कुटुंबासह एका वर्षासाठी केले बहिष्कृत  title=

पुणे : जागेचा न्याय-निवडा जात पंचायतीसमोर (Jat Panchayat) करण्यास नकार दिल्याने निर्माण झालेल्या वादातून  महिलेला कुटुंबासह एका वर्षासाठी बहिष्कृत (Woman boycotted) केल्याची घटना पुण्यात (Pune) घडली आहे. दंडापोटी जात पंचायतीने एक लाख रुपये, पाच दारू बाटल्या, पाच बोकडांची मागणी केली. तसेच दंड न दिल्यास कायम स्वरूपी बहिष्कार टाकण्याची "जात पंचायतीची' घोषणा केली आहे. पुण्यातील घटनेने संताप व्यक्त होत आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासवड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. रिटा कुंभार या तरुणीने घनकवडी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यात मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले. 

रिटा या मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या संपतीचे वाटप करायचे होते. मात्र रिटाच्या वडिलांचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध होते. त्यावरून वाद मिटवायचा म्हणून जात पंचायत बोलावण्यात आली. मात्र त्याठिकाणी पैशे आणि बोकडांची मागणी केली गेली. त्यावरून शिवीगाळ देखील झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरू आहे.