रिक्षातून घरी परतणाऱ्या मायलेकींना ट्रकने चिरडले... आईसह पाच वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू

Yavatmal Accident : हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ऑटोरिक्षाचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू तर सहाजण जखमी झाले आहेत. शिरपूर पोलीसांनी याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Updated: Apr 7, 2023, 12:48 PM IST
 रिक्षातून घरी परतणाऱ्या मायलेकींना ट्रकने चिरडले... आईसह पाच वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू title=

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ :  यवतमाळच्या (Yavatmal News) वणी येथून शिंदोला येथे जाणाऱ्या ऑटो रिक्षाला (auto) भरधाव ट्रकने धडक दिल्याने मायलेकींचा मृत्यू झाला आहे. भरधाव असलेल्या ट्रकने प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत मुलीसह आईचा जागीच मृत्यू झाला. ही महिला आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह गावी जात होती. मात्र रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला. ट्रकच्या धडकेत संजीवनी नागतुरे आणि त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. मृत मायलेकी या कुर्ली गावातील रहिवाशी होत्या. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात एकूण सहा जण जखमींझाले आहेत. शिरपूर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकमध्ये अपघातात दोघांचा मृत्यू

पिकप आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झालाय. पिकअप गाडी पिंपळगावच्या बाजूने वणीकडे जात असताना हा अपघात झाला. यावेळी रोडच्या कडेला उभ्या असलेल्या फॅशन प्रो मोटरसायकलला पिकअप गाडीने उडवले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. साहिल सुनील शिरसाठ 15 आणि स्नेहल सुनील शिरसाठ (12) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे सख्खे भाऊ बहीण आहेत.

तर सुनील आणि सोनाली शिरसाठ, रमणाबाई आप्पा खवळे हे या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे .मयत व्यक्तींवर वणी ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पिकअपचा चालक गोकुळ रामहरी शेळके याला वणी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

दरम्यान, सातऱ्यातील लोणंद निरा रोडवर झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रेल्वे उड्डाण पुलावरील एसटी व मोटारसायकलच्या धडकेत तीन युवकांचा जागीच मृत्यू झालाय. अपघातात मृत्यू झालेले तिघेही पुरंदर तालुक्यातील  पिपंरे खुर्द येथील असल्याचे समोर आले आहे. रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेल्या एसटीबसची मोटारसाईकलसोबत जोरदार धडक झाली.