पुण्यात शिकणारी मुलं संभाजीनगरहून ड्रग्ज घेऊन जायची; आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश झाला आहे.  उच्चभ्रू घरातल्या तरुणांना नशेची सवय लावणारं रॅकेट उघड झाले आहे.  संभाजीनगरमधून ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.   

Updated: Jul 25, 2023, 07:11 PM IST
पुण्यात शिकणारी मुलं संभाजीनगरहून ड्रग्ज घेऊन जायची; आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश title=

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : संभाजीनगर पोलिसांनी अमली पदार्थांचं मोठं रॅकेट उघडकीस आणले आहे. उच्चभ्रू घरातील तरुणांना नशेची सवय लावणा-या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. संभाजीनगर पोलिसांनी पुंडलिक नगर भागात तब्बल चार ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांनी साडे 3 किलो गांजा, एमडी, चरस असा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. पुण्यात शिकणारी मुलं संभाजीनगरहून ड्रग्ज घेऊन जायची आणि तिथं मित्रांसह ड्रग्ज पार्ट्या करायची, अशी माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. अशा पार्ट्यांचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

आधी तरुणांना ड्रग्ज फुकट दिले

अल्पवयीन मुलांना नशेच्या जाळ्यात ओढणारे एक रॅकेटस आता संभाजीनगर पोलिसांनी उघडं केलेला आहे ही सगळी घर  मुलं उच्चभ्रू घरातील आहेत. बहुतांश मुलं,संभाजी नगर पुणे आणि मुंबईची आहेत.  पुणे जिल्ह्यातील एक नामांकित संस्थेत हे शिकतात, त्यांच्या फ्लॅट वर ड्रग्ज पार्ट्या चालायच्या.  याची सुरूवात संभाजी नगरहुन झाली. पूल टेबल वर खेळायला जाणारे,  व्हीडिओ गेम वर खेळायला जाणाऱ्या चांगल्या घरातील मुलांना या ड्रग रॅकेटची लोक हेरायची आणि त्यांचा सोबत गोडी गुलाबीने बोलून  त्यांना नशेच्या धंद्यात ओढायची. सुरुवातीला कोकेन असो वा चरस हे या मुलांना फुकट दिले आणि नंतर जशी सवय लागली तशी तुझ्या मित्रांना सवय लाव तुला मोफत या पद्धतीने मुलांना नादी लावले, अगदी मार्केट मध्ये एम एल एम म्हणजे मल्टि लेव्हल मार्केटिंग पद्धत असते ताशा पद्धतीने या अंमली पदार्थांची विक्री या तस्करणी मुलांना हाताशी घेऊन केली.  मोठ्या रकमेने त्यांनी विक्री सुरू केली. या संभाजी नगरच्या मुलांनी संभाजी नगर हुन नेलेल्या ड्रग मधून पुण्यात एक पार्टी केली आणि त्याचे व्हीडिओ सुद्धा काढले मात्र एक पालकांने आपल्या मुलाच्या मोबाईल मध्ये हे व्हीडिओ पाहिले आणि हा प्रकार पुढं आला. नंतर अशा तब्बल 25 वर मुलांच्या चौकशीतून काही नाव पुढं आली आणि पोलिसांनी कारवाई सुरू केली.  मंगळवारी  4 ठिकाणी छापे टाकले,  त्यात 1 जणांकडून 3.5 किलो गांजा, 1.2 ग्राम एमडी आणि .4.5 ग्राम चरस जप्त केली, मात्र ही साखळी मोठी आहे आणि त्यातून अनेक नाव पुढं येणार आहे प्राथमिक अंदाजानुसार मोठया संख्येने मुलं मुली यात अडकली असण्याची शक्यता आहे.

भाजपा नेते  प्रमोद राठोड यांच्यामुळे उघड झाला प्रकार

संभाजीनगरचा हा  प्रकार उघड झाला आहे तो भाजपा नेते  प्रमोद राठोड यांच्यामुळे  काही पालक त्यांना भेटायला आले आणि त्यांनी आपली मुलं अशा पद्धतीने वाया गेली असल्यास त्यांना सांगितलं त्यानंतर पालक काही डॉक्टर्स आणि ही सगळी मंडळी एकत्र बसली आणि मुलांकडून त्यांनी सगळी माहिती घेतली आणि त्यानंतर या सगळ्या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. चांगल्या घरच्या मुलांना हेरून हा प्रकार सुरू असल्याचा प्रमोद राठोड यांनी सांगितलं त्यामुळे आता पालकांनी काळजी घेण्याचा आवाहनही त्यांनी केले.