'या' सेलेब्सने शेअर केले आपल्या इकोफ्रेंडली बाप्पाचे फोटो

हल्ली आपल्याला उत्सवांमध्ये जागृकता आल्याचं लक्षात येते. सगळेच भाविक इकोफ्रेंडली बाप्पा घरी विराजमान करण्याच्या प्रयत्नात असतात. मग यामध्ये आपले मराठी सेलेब्स देखील कसे मागे राहतील. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 24, 2017, 05:25 PM IST
'या' सेलेब्सने शेअर केले आपल्या इकोफ्रेंडली बाप्पाचे फोटो  title=

मुंबई : हल्ली आपल्याला उत्सवांमध्ये जागृकता आल्याचं लक्षात येते. सगळेच भाविक इकोफ्रेंडली बाप्पा घरी विराजमान करण्याच्या प्रयत्नात असतात. मग यामध्ये आपले मराठी सेलेब्स देखील कसे मागे राहतील. 

यंदा अनेकांनी आपल्या घरी इकोफ्रेंडली बाप्पा विराजमान करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अभिनेता राकेश बापट, दिग्दर्शक रवी जाधव आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांचा देखील समावेश आहे. या तिघांनी गणेश चतुर्थीच्या आदल्याच दिवशी आपल्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

 ही गणेशमूर्ती राकेशने स्वहस्ते तयार केली असून, त्यासाठी त्याने नदीच्या गाळाचा आणि नैसर्गिक रंगाचा वापर केला आहे. आपल्या बाप्पाची प्रतिकृती बाजारातून विकत न घेता स्वतःच्या हाताने बनवून, त्याची अगदी भक्तिभावाने बापट कुटुंबात प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. अश्याप्रकारे घरातच गणेशमूर्ती बनवणा-या या मराठीतील 'राजन'चा यंदाचा गणेशोत्सव अनेक कारणांनी खास ठरतोय. याबद्दल बोलताना राकेश सांगतो की, 'गणेशमूर्ती बनवण्याची परंपरा माझ्याघरी पूर्वीपासून आहे. मी गेले अनेक वर्ष गणपतीची मूर्ती बनवतो. गणपती बनवताना कोणता आकार किवा कोणत्या थीमवर बनवायचा हे मी कधीच ठरवत नाही, मला फक्त बाप्पा साकारायचा असतो.'

त्याचप्रमाणे नुकतंच दिग्दर्शक आणि अभिनेता रवी जाधवने आपल्या पत्नीसह आपल्या लाडक्या बाप्पाचा फोटो शेअर केला आहे. अगदी सुबक आणि मनमोहक अशी ही मूर्ती आपल्याला आकर्षित करते. या दोघांनी आपल्या बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत. 

त्याचप्रमाणे बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकरने प्रसिद्ध असलेल्या ट्री गणेशाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ती यंदा आपल्या घरी हा बाप्पा विराजमान करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्री गणेशाला सुरूवातीपासूनच खूप चांगली पसंती मिळाली.