शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, मार्चपर्यंतच आहे मुदत

आधार क्रमांकाची नोंद मार्चपर्यंत करण्याचे आदेश

Updated: Dec 17, 2020, 12:11 PM IST
शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, मार्चपर्यंतच आहे मुदत  title=

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही बातमी महत्वाची आहे. आधार नोंदणी ही आता विद्यार्थ्यांसाठी देखील बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या पाल्याची आधार नोंदणी झाली का ? याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची आधार नोंदणी शंभर टक्के बंधनकारक केलीय.

सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद मार्चपर्यंत करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचीच संख्या ग्राह्य़ धरण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आलंय.

यासाठी आता शाळांना धावपळ करावी लागणार आहे. शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांचे आधार पत्रक काढण्यासाठी धावपळ होणार आहे.