Uddhav Thackeray : आताची सर्वात मोठी बातमी; निवडणुकांसंदर्भात उद्धव ठाकरे यांचे महत्त्वाचे विधान

शिवसेना भवनातून उद्धव ठाकरे यांच्या संपर्कप्रमुखांना सूचना

Updated: Nov 5, 2022, 03:38 PM IST
Uddhav Thackeray : आताची सर्वात मोठी बातमी; निवडणुकांसंदर्भात उद्धव ठाकरे यांचे महत्त्वाचे विधान title=
(फोटो सौजन्य - PTI)

मुंबई : शिवसेनेतील (Shivsena) फूटीनंतर राज्यातील सत्तातरानंतर मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) - देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचे सरकार सत्तेवर आलं आहे. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह आदित्य ठाकरे (aaditya Thackeray) यांनीही शिंदे गटाविराधोत बंड थोपटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी थेट शिंदे गटातील आमदारांच्या मतदारांसंघात जात सत्तेतून बाहेर पडून निवडणुका लढण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता निवडणुकांसदर्भात उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे विधान केलंय.

राज्यामध्ये मध्यवधी निवडणुका (mid term elections) लागण्याची शक्यता असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे. शिवसेना भवनात (shivsena bhavan) मेळाव्यात संपर्कप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य केले आहे. तसेच निवडणुकांच्या तयारीला लागा अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना दिल्या आहेत. राज्यात मध्यावर्ती निवडणुका लागणार असल्याचे भाकित उद्धव ठाकरे यांनी वर्तवले आहे.

दरम्यान, याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यवर्ती निवडणुकांची शक्यता नाकारली होती.  सरकार केव्हाही कोसळू शकते, त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, असे शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांन सांगितले असे म्हटले जात होते. मात्र शरद पवार यांनी याबाबत खुलासा केला होता. "मध्यावधी निवडणुका लागतील असे मी म्हणालोच नव्हतो. दोन अडीच वर्षे राहिली आहेत. त्यामुळे तयारीला आतापासून लागले पाहिजे, असे म्हणालो होते. याचा अर्थ मध्यावधी निवडणुका होतील असा नाही. प्रत्यक्ष निवडणुका येतात. त्याआधी सहा महिने एक वेगळे वातावरण असते. त्यामुळे खरं बघायचं झालं तर आपल्याकडे फक्त दोन वर्षे आहेत. त्या दोन वर्षांमध्ये आपली पूर्ण तयारी असली पाहिजे. हे लक्षात घेऊन तयारीला लागा हे सूचवलं होतं," असे शरद पवार यांनी म्हटले होते. 

तर दुसरीकडे अजित पवार यांनीही मध्यावधी निवडणुका होणार नाहीत असे अजित पवार यांनी म्हटले होते. मध्यावधी निवडणुका कोणालाही परवडणाऱ्या नाहीत. पाच वर्षांचा कालावधी विद्यमान आमदार पूर्ण करतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते.