"शिवसेनेनं मुस्लिमांना घरात जाऊन प्रार्थना करा असं का सांगितलं नाही?"

राज्यात  गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसाचा (Hanuman Chalisa Controversy) वाद चांगलाच पेटलाय. 

Updated: Apr 26, 2022, 08:18 PM IST
"शिवसेनेनं मुस्लिमांना घरात जाऊन प्रार्थना करा असं का सांगितलं नाही?"  title=

मुंबई : राज्यात  गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसाचा (Hanuman Chalisa Controversy) वाद चांगलाच पेटलाय. शिवसेनेनं (Shiv Sena) हनुमान चालिसाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजप (BJP) आक्रमक झालीय. भाजपच्या आयटी सेलनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. (bjp aggresive over to shiv sena reaction on hanuman chalisa and namaz)

हनुमान चालिसावरून सुरू झालेला वाद आता रस्त्यावरच्या नमाजपर्यंत येऊन ठेपलाय. हनुमान चालिसा घरात वाचा असा सल्ला देणाऱ्या संजय राऊतांना (Sanjay Raut) आता भाजपच्या आयटीसेल प्रमुखांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेला रस्त्यावरची नमाज कशी चालते? हनुमान चालिसालाच विरोध कशासाठी असे सवाल भाजप आयटीसेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केले आहेत. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हंटलंय. 

भाजप आयटीसेलचा शिवसेनेवर आरोप 

इतकी वर्षं रस्त्यावर नमाज अदा केली जात आहे. 5 वेळा अजान होते. तेव्हा शिवसेनेनं मुस्लिमांना घरात जाऊन प्रार्थना करा असं का सांगितलं नाही? मात्र हनुमान चालिसा पठण सार्वजनिक ठिकाणी करता येणार नाही. मुस्लिमांना सातत्यानं दिली जाणारी सवलत भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारी आहे. 

संजय राऊतांच्या नेमक्या कोणत्या वक्तव्यामुळे नमाज आणि चालिसाचा वाद पेटलाय ते पाहूयात.

राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर हनुमान चालिसाचा मुद्दा चांगलाच तापलाय. आता भाजपनं रस्त्यावरच्या नमाजवरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे चालिसा आणि नमाजचा संघर्ष आणखीन पेटण्याची चिन्ह आहेत.