पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, असा भाजपचा खेळ : नाना पटोले

Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. मात्र भाजपने पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, असा खेळ सुरू केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. 

Updated: Jun 21, 2022, 03:34 PM IST
पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, असा भाजपचा खेळ : नाना पटोले title=

मुंबई : Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. मात्र भाजपने पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, असा खेळ सुरू केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मात्र त्यांचा हा खेळ यशस्वी होणार नसून आम्ही मुंबईत काँग्रेस पक्षाचे नेत्यांसोबत चर्चा करून पुढचं धोरण निश्चित करु असंही ते म्हणाले.

केंद्राच्या सत्तेचा दुरुपयोग केला गेला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा दुरुपयोग करून कर्नाटक आणि मध्यप्रदेश सरकार पाडले तसे महाराष्ट्र सरकार पडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचे हे प्रयत्न लोकशाहीला घातक आहेत. सत्य परेशान हो सकता है पराजित नाही, असा टोला नाना पटोले यांनी भाजपला लगावला आहे.

कर्नाटक आणि मध्य प्रदेश सरकार जनतेने निवडून दिले ते पाडले. भाजप महाराष्ट्रात जनतेचे सरकार पडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. आम्ही प्रत्येक परीक्षा सामोर जाऊ. काँग्रेस मध्ये कोणीही नाराज नाही, असे पटोले म्हणाले.

 विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांची नाराजी अल्पकाळाची आहे. आम्ही आत्मचिंतन करु, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांची नाराजी अल्पकाळाची आहे, असे ते म्हणाले. 

विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची काही मते फुटली. याबाबत काँग्रेसच्या आमदारांची मुंबईत बैठक बोलावली आहे. यात विचारविनिमय करू, असे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारला धोका नाही, असेही पटोले यांनी सांगितले. काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थानी पक्षाची महत्वाची बैठक पार पडणार आहे.

दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे हे नॉटरिचेबल असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी बंडखोरी केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ते आपल्या समर्थक आमदारांसह सुरतमधील ली मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे सुमारे पंधरा आमदार असल्याची माहिती आहे.