मुंबई महापालिकेला धनुष्य बाणाचं वावडं, अकादमीतला खेळ धोक्यात

 महापौर निवासाच्या हिरवळीवर काल पत्रा छेदून एक बाण आत आला होता.

Updated: Oct 13, 2018, 08:18 PM IST
मुंबई महापालिकेला धनुष्य बाणाचं वावडं, अकादमीतला खेळ धोक्यात title=

मुंबई : मुंबई महापालिकेला धनुष्य बाणाचं वावडं असल्याचं समोर आलंय. दादरमधल्या शिवाजी पार्क इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आर्चरी अकादमीवर महापालिकेनं कारवाई केलीय. अकादमीनं सुरक्षेसाठी लावलेले पत्रे हटवण्यात आलेत. स्मारकाच्या शेजारी असलेल्या महापौर निवासाच्या हिरवळीवर काल पत्रा छेदून एक बाण आत आला होता.

कोणती कल्पना नाही 

या अकादमीनं आतापर्यंत  आंतरराष्ट्रीय स्तरावर 9  खेळाडू घडवलेत. 48 राष्ट्रीय, 168 राज्यस्तरीय आणि 500 हून अधिक जिल्हास्तरावरच्या स्पर्धेत अकदमीतल्या खेळाडूंना पदकं मिळालीयत. गेली ९ वर्षं इथे हा प्रशिक्षणवर्ग सुरू आहे. या कारवाईआधी महापालिकेनं कुठलीही कल्पना दिली नाही, असं स्मारकाच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे.

महिनाभरापूर्वी नोटीस 

महापालिकेच्या कारवाईमुळे या अकादमीतला खेळ धोक्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर कारवाई करण्याआधी महिनाभरापूर्वी नोटीस दिल्याचा महापालिकेचा दावा आहे.