मध्य रेल्वे : कल्याण ते कसारा 'जम्बो ब्लॉक', प्रवाशांची 'जम्बो' अडचण

 मध्य रेल्वेने प्रवाशांना कोणतीही कल्पना न देता कल्याण ते कसारा जंबो ब्लॉक घेण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. हा ब्लॉक गुरूवारी घेतला जाणार आहे.

Updated: Jan 17, 2018, 04:51 PM IST
मध्य रेल्वे : कल्याण ते कसारा 'जम्बो ब्लॉक', प्रवाशांची 'जम्बो' अडचण title=

मुंबई: मध्य रेल्वेने प्रवाशांना कोणतीही कल्पना न देता कल्याण ते कसारा जंबो ब्लॉक घेण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. हा ब्लॉक गुरूवारी घेतला जाणार आहे.

आंबिवली रेल्वे स्थानकात भारतीय लष्करातर्फे पादचारी पूल बांधण्याचं काम सुरू आहे. याच कामासाठी उद्या सकाळी पावणे दहा ते दुपारी 3 वाजेपर्यंत कल्याण ते कसारा मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. यादरम्यान लांब पल्ल्याच्या काही गाड्या देखील रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत.

या ब्लॉक दरम्यान एसटी महामंडळ आणि केडीएमसीतर्फे विशेष बससेवा चालवण्यात येणार आहे.. मात्र उद्या वर्किंग डे असल्याने कसारा, टिटवाळा,आसनगाव परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होणाराय.