सरनाईक यांच्यावर ईडी कारवाई, देवेंद्र फडणवीस यांना सचिन सावंत यांचे सवाल

शिवसेना  (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या संदर्भात ईडीने (ED) केलेली कारवाई ही राजकीय आकसापोटी केल्याचा आरोप काँग्रेस (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला आहे. 

Updated: Nov 28, 2020, 09:12 AM IST
सरनाईक यांच्यावर ईडी कारवाई, देवेंद्र फडणवीस यांना सचिन सावंत यांचे सवाल title=

मुंबई : शिवसेना  (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या संदर्भात ईडीने (ED) केलेली कारवाई ही राजकीय आकसापोटी केल्याचा आरोप काँग्रेस (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला आहे. टॉप्स सिक्युरिटीला (Top Security) कंत्राट आधीच्या सरकारच्या काळात देण्यात आले, याचे  उत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

विरोध पक्षांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापर होत आहे. २०१४ पासून केंद्रातील सरकारने ईडी, सीबीआय, आयकर या संस्थांचा विरोधी पक्षांच्या विरोधात गैरवापर केलेला आहे. विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्यासाठी या संस्थांचा वापर केला जात आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सराकारमधील घटक पक्ष शिवसेनेच्या आमदारांवरील ईडीची कारवाई त्याच पद्धतीची आहे, असा थेट आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची सुरुवात आहे. भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यांवर हेच स्पष्ट होत आहे. राजकीय आकसापोटी ही कारवाई विरोधी पक्षांचे सरकार अस्थिर करण्यासाठी भाजप, आरएसएसच्या इशाऱ्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. ज्यांनी टॉप्स सीक्युरिटी कंपनीला कंत्राट दिले त्या भाजप नेत्यांची चौकशी ईडी का करत नाही, असा सवाल  सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

कंत्राट २०१४-१५ ला टॉप सिक्युरिटी ला मिळाले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री कोण होते? देवेंद्र फडणवीस MMRDA चे अध्यक्ष कोण होते?  मग हे कंत्राट कसे दिले गेले? याचे उत्तर कोणी दिले पाहिजे? देवेंद्र फडणवीस यांनी ना. ते पाच वर्ष गप्प का बसले ? , ९ कंपन्यांना काम देण्यात आले, ६ पैकी १ टॉप्स सिक्युरिटी आहे. १५ कोटींचे काम विभागून दिले जातं. किरीट सोमय्या खोटं बोलत आहेत. MMRDA ने कंत्राट दिलं, हे कंत्राट आधीच्या सरकारच्या काळात देण्यात आलं, याचं उत्तर फडणवीस यांनी दिलं पाहिजे. जर लाच घेतली गेली असं वाटतं असेल तर पाच वर्षांत चौकशी का केली नाही, असा थेट सवाल सचिव सावंत यांनी केला.

 कंत्राट द्यायचे फडणवीस यांनी  दिले आहे ना, सरनाईक नगरविकास मंत्री होते की मुख्यमंत्री होते? मुख्यमंत्र्यांपेक्षा सरनाईक पॉवरफुल्ल होते का?, याचे उत्तर फडणवीस यांनी दिले पाहिजे, असे सावंत म्हणाले. दरम्यान, राज्य सरकार चांगली कामगिरी करत असल्यामुळे ठाकरे घराण्याची प्रतिमा खराब करण्याचे काम विरोधकांकडून सुरू असल्याचा आरोप परिवहनमंत्री अनिल परब यांनी केलाय. अनुभवाच्या गप्पा मारणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना तरी कुठं पाच वर्षांपूर्वी प्रशासन कळत होत असा टोलाही त्यांनी लगावलाय.