कोरोनाच्या सावटावर निरोगी आरोग्याची गुढी उभारण्याचा संकल्प

आजचा संयम उद्याचा आनंद ठरू शकतो 

Updated: Mar 25, 2020, 08:46 AM IST
कोरोनाच्या सावटावर निरोगी आरोग्याची गुढी उभारण्याचा संकल्प title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : आज गुढीपाडवा... मराठी नवीन वर्षाचा पहिली दिवस... उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्याचा आजचा दिवस. पण सध्या 'कोरोना'चं सावट असल्याचं दिसून येत आहे. मराठी म्हणीप्रमाणे,'सर सलामत तो पगडी हजार'. अशीच काहीशी आताची अवस्था आहे. यामुळे सण साजरा करताना सरकारने दिलेल्या सर्व नियमांच पालन करा. 

जिवापेक्षा अधिक काहीच नाही. कोरोनाच्या विषाणूपासून उत्पन्न होणारा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने घरात राहूनच आजचा दिवस साजरा करा. घरा बाहेर न पडता आज खऱ्या अर्थाने कुटुंबासोबत आजचा दिवस साजरा करा. 

आज गुढीपाडवा असल्यामुळे अनेक नागरिक खरेदीसाठी बाहेर पडल्याच चित्र दिसत आहे. असं न करता आज घरात असलेल्या पदार्थांसोबतच आजचा दिवस साजरा करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. सरकारमार्फत योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. फक्त आपण दिलेल्या नियमांच तंतोतंत पालन करायचं आहे. 

ठाण्यातील गुढीपाडवा म्हणजे जल्लोष असतो. मोठमोठ्या रथ यात्रा निघतात. परंतु यंदा मात्र या सणावर कोरोनाचा सावट आहे. त्यामुळे ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि अंबरनाथ इथल्या सर्व शोभा यात्रा रद्द करण्यात आल्यायत. आज सर्व रस्त्यावर शुकशुकाट आहे आणि भयाण शांतता आहे. पण ही शांतता आपण आगामी काळात उत्साहात साजरी करू यात काहीच शंका नाही.