पुण्यानंतर मुंबईतही कोरोना व्हायरसची धडक, 2 जणांना लागण

ज्याची भीती सर्वांना होती अखेर तेच झालं, पुण्यापाठोपाठ मुंबईतही कोरोनाने धडक दिली आहे. तपासणीत 

Updated: Mar 11, 2020, 08:09 PM IST
पुण्यानंतर मुंबईतही कोरोना व्हायरसची धडक, 2 जणांना लागण title=

मुंबई : ज्याची भीती सर्वांना होती अखेर तेच झालं, पुण्यापाठोपाठ मुंबईतही कोरोनाने धडक दिली आहे. तपासणीत कोरोनाचे 2 रूग्णांची चाचणी पॉझेटिव्ह आली आहे. या दोन्ही रूग्णांना उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी पुण्यातील 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आता महाराष्ट्रात एकूण 7 जणांना कोरोनाची लागण जाली आहे.

पुण्यातील रूग्णांचा प्रवास हा दुबई ते मुंबई एअरपोर्ट असा झाला होता, मुंबई एअरपोर्टवरून ज्या खासगी टॅक्सीने ते गेले त्या चालकाला कोरोनाची लागण झाली होती, तर ज्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती, त्यांच्या मुलीला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाचं संक्रमण होवू नये, म्हणून प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे, परदेशातून आलेले व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.