मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, सायकलसाठी राखीव लेन

मुंबईत दर रविवारी सकाळी ७ ते १० पर्यंत मरीन ड्राईव्ह येथे सायकल चालवण्यासाठी खास लेन राखीव ठेवली जाणार आहे. 

Updated: Dec 3, 2017, 05:56 PM IST
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, सायकलसाठी राखीव लेन title=

मुंबई : मुंबईत दर रविवारी सकाळी ७ ते १० पर्यंत मरीन ड्राईव्ह येथे सायकल चालवण्यासाठी खास लेन राखीव ठेवली जाणार आहे.

आजपासून या स्पेशल लेनची सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात  नरीमन पॉइन्ट ते गिरगाव चौपाटी आणि नंतर वरळी सी फेस पर्यंत हा टप्पा वाढवण्यात येणार आहे.

तुमच्याकडे स्वत:ची सायकल नसली तरी तुम्हाला भाड्यानं सायकल घेता येणार आहे. महापालिका, ट्रॅफीक पोलीस यांच्या माध्यमातून हा सायकल ट्रॅकचा उपक्रम सुरु करण्यात आलाय.