मुंबईकरांचे पाणी महागले

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी.....महागाईचा आगडोंब उसळलेला असताना मुंबईकरांना आता पिण्याच्या पाण्यासाठीही जादाचे पैसे मोजावे लागणार आहेत. 

Updated: Jun 14, 2018, 05:13 PM IST
मुंबईकरांचे पाणी महागले title=

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी.....महागाईचा आगडोंब उसळलेला असताना मुंबईकरांना आता पिण्याच्या पाण्यासाठीही जादाचे पैसे मोजावे लागणार आहेत.  मुंबईत पिण्याच्या पाण्याचे दर तब्बल आठ टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. नवे दर उद्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहेत. घरगुती आणि व्यावसायिक वापराचं पाणी महागणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय.