मुंबईतील क्रिस्टल टॉवरचा बिल्डर सुपारीवाला याला अटक

क्रिस्टल टॉवर बिल्डर सुपारीवाला याला पोलिसांनी अटक केली आहे.

Updated: Aug 22, 2018, 11:29 PM IST
मुंबईतील क्रिस्टल टॉवरचा बिल्डर सुपारीवाला याला अटक title=

मुंबई : परळमध्ये असणाऱ्या क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झालाय. दरम्यान, क्रिस्टल टॉवरला भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट किंवा ओसीच नसल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आलीय. तसेच अग्निशमन यंत्रणा बंद ठेवल्याप्रकरणी बिल्डर सुपारीवाला याला पोलिसांनी अटक केली आहे.

 क्रिस्टल टॉवरमध्ये मोठी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून बहुतांश रहिवाशांचे प्राण वाचवले. पण आग लागल्यावर धुरामुळे गुदमरून चौघांचा मृत्यू झाल्याचं आता पुढे आले. त्यापैकी दोन रहिवाशांनी लिफ्टनं खाली उतरण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातच दोघांचा मृत्यू झालाय. दरम्यान १६ जणांवर केईएममध्ये उपचार आहेत. 

क्रिस्टल टॉवरला भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट किंवा ओसीच नसल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आलीय. १४ मजल्यांच्या या इमारतीत अनेक कुटुंब राहत होती. पण मूलभूत सुविधाच नसल्याचं पुढे आलंय. २०१६ मध्ये क्रिस्टल इमारतीच्या बिल्डरला नोटीस पाठवली होती. पण कारवाई मात्र झालीच नाही. इमारतीत आगीवर नियंत्रण आणणारी कुठलीच यंत्रणाही नव्हती. त्यामुळेच आता जशी बिल्डरवर कारवाई होईल तशी पालिकेच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार का? असा प्रश्न विचारण्यात येतोय.