खुशखबर! या रविवारी मुंबईत रेल्वेचा मेगाब्लॉक नाही

मेगाब्लॉक नसला तरी रेल्वेच्या फेऱ्या रविवारच्या वेळापत्रकानुसारच चालवण्यात येणार

Updated: Oct 26, 2019, 05:10 PM IST
खुशखबर! या रविवारी मुंबईत रेल्वेचा मेगाब्लॉक नाही title=

मुंबई : दिवाळीनिमित्त रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना दिलासा दिला आहे. दर रविवारी दुरूस्ती आणि देखभालीसाठी घेण्यात येणारा मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक रद्द केला आहे. पश्चिम रेल्वेवर घेण्यात येणारा नाईट ब्लॉक देखील रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

मात्र मेगाब्लॉक नसला तरी रेल्वेच्या फेऱ्या रविवारच्या वेळापत्रकानुसारच चालवण्यात येणार आहेत. तर सोमवारीही सुट्टीकालीन वेळापत्रक लागू राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

रेल्वे प्रशासनाकडून हा प्रवाशांसाठी फार मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण गणेशोत्सव काळात रेल्वेने आपला मेगाब्लॉक नियोजित वेळेनुसार घेतला होता. पण गणेशोत्सवाच्या काळात ट्रॅकवर सतत पाणी भरत असल्याने रेल्वेसाठी हा काळ तसा कठीण होता.