४८ तासात राज्याच्या काही भागात गारपीट-मुसळधार पाऊस

हवामान खात्याकडून पुढच्या ४८ तासांत राज्यात गारपिटीचा इशारा देण्यात आलाय.

Updated: Jun 3, 2018, 04:06 PM IST

मुंबई : हवामान खात्याकडून पुढच्या ४८ तासांत राज्यात गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रात गारपीट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मात्र शेतकरी वाट पाहत असलेला मान्सून ६ जूननंतर राज्यात दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आलीय.